मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita

 मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita

खूपच छान असेल तो दिवस...
जेव्हा मी कायमचाच झोपणार
आणि मला उठविण्यासाठी....
सगळेच रडणार...!

मृत्यू-वर-सुंदर-कविता-मराठी-छान-कविता-Marathi-kavita-विजय-भगत-vb-good-thoughts
मृत्यू वर सुंदर कविता - मराठी छान कविता - Marathi kavita

माझ्या देहाला सजवत होते... मी पूर्णतः शांत झोपलो  होतो..!
अश्रूंच्या धारेने बहुतेक मी... चिंब - चिंब भिजलो होतो..!
 
आंघोळ ही शेवटचीच.... परंतु गरम पाण्याने होत होती...!
ज्याला त्याला घाई होती.... डोळे भरून मला पाहण्याची..!
 
माझे पूर्ण बालपण गेले ज्यांच्या खांद्यावरून
पुन्हा त्यांनीच आज उचलून घेतले दारावरून
 
सगळे जवळचेच होते... कुणीही नव्हतेच तिथे परके....
मोठ्याने म्हणत होते... नेऊ नका सारखे...!
 
वेगळे काहीतरी आज घडत होते...!
शत्रू चे पण प्रेम माझ्यावर पडत होते...!
 
स्मशानभूमीत नेऊन ही... स्नेह माझ्यावर लुटवत होते...!
मोठ्याने रडून - रडून सगळे मला उठवत होते...!
 
चार लाकडे अजून द्या म्हणजे इतक्यात भागणार....
कुणीतरी माझ्यानेच विचारले किती वेळ अजून लागणार....!
 
सरणावर झोपूनही मी आपले मौन पाळले होते...!
जिव लावणारे सगळेच माझे होते...
आज त्यांनीच मला जाळले होते....!

 

Comments

Popular posts from this blog

नवरा बायकोचे प्रेम - नवरा बायको मराठी स्टेट्स | Husband wife Quotes In Marathi

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

35+ Marathi Status On Life | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार