वडिलांचा आशीर्वाद - एक सुंदर बोधकथा– Marathi Story
गुजरातमधील खंभायत येथील एका व्यावसायिकाची ही सत्य घटना आहे.
असे माझ्या वाचनात आलेले आहे. जेव्हा त्या व्यावसायिकाला वाटले कि आता आपला
शेवट निश्चित आहे. तेव्हा त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला जवळ करून म्हणाला की... माझ्या लाडक्या मुला... तुला द्यायलामाझ्याकडेसंपत्तीनाही...!पण मी जीवनभर सत्य
आणि सत्यतेनेच काम केले आहे. माझा आशीर्वाद आहे की... तु आपल्या जीवनात खूप खूप
सुखी राहशील... तु जरी धूळ-मातीलाही स्पर्श केला तरी त्याचे देखील नक्कीच सोने होईल.
मुलाने डोके टेकून वडिलांच्या पायाला स्पर्श केला. मुलाच्या डोक्यावर हात ठेवूनवडिलांनी आशीर्वाद दिला आणि अगदी संतोष पूर्वक आपले प्राण सोडले.
आता घराची सगळी जवाबदारी मुलगाधर्मपाल याच्यावर आली. त्याने छोट्या गाडीवरून
आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचा व्यवसाय हळू हळू वाढू लागला.
एक छोटीसीदुकान घेतली. व्यवसायात आणखी वाढ झाली.आताशहरातील संपन्न
लोकांमध्येधर्मपाल ची गणना होऊ लागली.त्याचा असा विश्वास होता की हे सर्व माझ्या
वडिलांच्या आशीर्वादाचेच "फळ "आहे...! कारण त्याने आयुष्यात खूप दुःख सहन केले
परंतु कधीही संयम सोडला नाही, श्रद्धा सोडली नाही, प्रामाणिकपणा सोडला नाही, म्हणून
त्यांच्या बोलण्यात शक्ती आली आणि त्याचे आशीर्वाद कामी आले आणि मी आनंदी सुखी
झालो. हे तो नेहमीच बोलत असे.
एक दिवसधर्मपाल च्या मित्राने त्याला विचारले... धर्मपाल जर तुझ्या वडिलांमध्ये इतकी
शक्ती होती... तरमग त्यांनी स्वत: साठी काहीही का केले नाही...?ते का आनंदी नव्हते...?धर्मपाल म्हणाला...मी वडिलांच्या शक्ती बद्दल नाही बोलत आहे... तरत्यांच्या आशीर्वादाच्या प्रभावा बद्दल बोलत आहे. अशा प्रकारे, तो पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांच्या आशीर्वादा बद्दल सांगत असे आणि लोकं त्याला फक्त "वडिलांचा आशीर्वाद" अशी नावे
देत असत. त्यावर धर्मपालाला काहीही हरकत नव्हतीच. धर्मपाल च्या मते त्यांना आपल्या वडिलांच्या आशीर्वादासाठी पात्र व्हायचे होते.
काही वर्ष असेच निघून गेले. नंतर धर्मपाल ने परदेशात व्यवसाय करायला सुरुवात केली. तिथेही त्याने जो व्यवसाय केला... त्यात त्याचा चांगलाच नफा झाला.
एक दिवस त्याच्या मनात आले कि व्यवसायात आपल्याला नेहमी नफाच नफा होतो... एकदा तरी आपण तोट्याचा व्यवसाय करायचा...! म्हणून त्याने आपल्या एका मित्राला ज्या व्यवसायात नेहमी तोटा होतो असा व्यवसाय सांगायला सांगितले
त्याच्या मित्राला वाटले की, धर्मपाल आपल्या यशाची आणि संपत्तीची खूप फुशारकी मारतो
आता त्याचा अहंकार दूर करण्यासाठी... याला असा व्यवसाय सांगतो की त्याला नक्कीच
तोटा होईल. म्हणून मित्रानेधर्मपाल ला सांगितले की, तू भारतातून लवंग खरेदी कर आणि जहाजात भरून आफ्रिकेच्या झांझिबारला विकुन ये. धर्मपाललाही हे योग्यच वाटले.
कारण झांझिबार हा लवंगाचाच देश आहे. व्यावसायिक तिथून लवंग भारतात आणतात
आणि दहा ते वीस पट किंमतीला विकतात. पण जर आपण भारतात खरेदी केली आणि
झांझीबार मध्ये विकली तर त्यात नक्कीच तोटा होणार आहे.पण धर्मपालने ठरवले की
मी लवंगा भारतातुन स्वतः झांझीबार येथेजाऊन विक्री करणार. मला हि पहायचे आहे
की" वडिलांचे आशीर्वाद " काय समर्थन देतात...!
तोटाकरण्यासाठी... धर्मपाल ने भारतातील सर्व लवंगविकत घेतल्या आणि त्याजहाजात
भरल्या आणि झांझीबार बेटावर पोहचला. झांझिबारमध्ये सुलतानाचे राज्य होते.
धर्मपालने तेथील व्यावसायिकांना भेटायला लांबवर प्रवास केला.
एकदात्याने, समोर एक व्यक्ती अनेक सैनिकांच्या बंदोबस्तात जात असलेला पाहिला,
त्याने एकाला विचारले की ते कोण आहे. तर तो म्हणाला की हे ह्या राज्याचे सुलतान आहेत. सुलतानने त्याच्याकडे बघून त्याला त्याची ओळख सांगण्यास सांगितले. धर्मपाल म्हणाला की,
मी भारतातील गुजरातचा प्रांत 'खंभायत' चा व्यावसायिक आहे आणि येथे व्यवसाय
करण्यासाठी आलो आहे.सुलतान त्याला एक व्यापारी मानुन...त्याचा आदर करत
त्याच्याशी बोलू लागला.
धर्मपालने पाहिले की सुलतानाबरोबर खूप सैनिक आहेत, परंतु त्यांच्या हातात फक्त चाळण्या आहेत, तलवार, बंदूक वगैरे काही नाही.तो आश्चर्यचकित झाला. आपले सैनिक असे घेऊन
का निघत आहेत हे त्याने नम्रपणे सुलतानाला विचारले.
त्यावर सुलतान हसला आणि म्हणाला की गोष्ट अशी आहे... आज सकाळी मी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला आलो होतो आणि माझ्या बोटातील एक हिरेजडित अंगठी कुठेतरी
पडली. वाळूमध्ये अंगठी नेमकी कुठे पडली हे मला माहित नाही. म्हणूनच मी हे सैनिक
सोबत आणले आहेत...! ही वाळू ह्या चाळणीने छाणून मी माझी अंगठी शोधणार आहे.
धर्मपाल म्हणाले- अंगठी खूप महाग आहे का...?
सुलतान म्हणाला– नाही...माझ्याकडे त्यापेक्षा बरीच मौल्यवान अंगठी आहेत.
पण ती अंगठी एका फकीरचा आशीर्वाद आहे.
माझा विश्वास आहे की माझे राज्य त्या फकीरच्या आशीर्वादाने खूप सामर्थ्यवान
आणि आनंदी आहे. म्हणून माझ्या मनात असे आहे की...
माझ्या राज्यापेक्षा ती अंगठी अधिक मूल्यवान आहे.
हे बोलल्यानंतर सुलतानाने पुन्हा विचारले, "बोला, सेठ - तुम्ही या वेळी काय आणले आहे...? धर्मपाल म्हणाला – लवंगा... सुलतानआश्चर्याने बघतच राहिला ..
अहो.. हा लवंगाचाच देश आहे...
आपण इथे लवंगा विकायला का आला आहात...?
असा सल्ला तुम्हालाकोणी दिला नक्कीच कोणीतरी आपला शत्रू असेल.
येथे मुठभर लवंगा लोकांना एक पैसात मिळतात.येथे लवंगा कोण खरेदी करेल आणि
आपण काय कमवाल...?
धर्मपाल म्हणाले की येथेही नफा आहे की नाही हे मला पहायचे आहे.
माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही व्यवसायात
नफाच कमावला आहे.तर मला आता हे पहायचे आहे की त्यांचे आशीर्वाद इथेही कामी
येतात काय...?
सुलतानने विचारले- वडिलांचे आशीर्वाद...?
याचा अर्थ काय...?
धर्मपाल म्हणाले की, माझ्या वडिलांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा आणि सत्यतेसह काम केले,
परंतु त्यांना पैसे कमवता आले नाहीत. मरणाच्या वेळी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला देवाच्या नावाने आशीर्वाद दिला की तुझ्या हातातली धूळसुद्धा सोने होईल.
असे बोलतांना धर्मपाल खाली वाकला आणि त्याने मूठभर वाळू जमिनी वरून ऊचलली आणि सम्राट सुलतान समोर मुठ्ठी उघडली आणि वाळू त्याच्या बोटावरून खाली सोडली.
धर्मपाल आणि सुलतान दोघांनाही आश्चर्य वाटले.त्याच्या हातातसुलतानाची हरवलेली
हिरेजडित अंगठी होती. अंगठी पाहून सुलतानाला खूप आनंद झाला.वाह देवा...!
आपली शक्ती ओलांडली नाही.
आपणही वडिलांचा आशीर्वाद खरा ठरविला. धर्मपाल म्हणाले की... तोच देव फकीरांच्या आशीर्वादाने खरा आहे. सुलतान खूप प्रसन्न झाला आणि त्याने धर्मपालला मिठी मारली आणि सांगितले की मागा सेठ.आज तूम्ही जे काही मागाल ते मी देईन.
धर्मपाल म्हणाला की... तुम्ही अनेक अनेक वर्षे जगावे आणि तुमचे राज्य आनंदी होवो. या व्यतिरिक्त मला काहीही नको आहे.सुलतान आणखीन आनंदी झाला. तो म्हणाला की... सेठ मी सर्व सामान विकत घेतो आणि तुम्ही सांगाल ती किंमत देतो.
शिक्षण -
ही कथा शिकवते की... जर पुण्यवान आई वडीलांचा आशीर्वाद मिळाला
तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला कोठेही पराभूत होऊ देणार नाही
त्यांच्या आशीर्वादासारखी दुसरी कोणतीही संपत्ती नाही.
ज्यांच्या आईने मुलाचे मन जाणून घेतले आहे आणि भविष्यातील गोष्टींची काळजी घेणारा
पिता आहे ते जगातील दोन महान ज्योतिषी आहेत, फक्त त्यांचा आदर करा,
नवरा बायकोचे प्रेम - नवरा बायको मराठी स्टेट्स | Husband wife Quotes In Marathi एका झोपडपट्टी भागात एक लहानसे झोपडे करून नवरा बायको राहत असत. नवरा कामाला जात असे आणि बायको घरीच राहत असे. तो माणूस खूप गरीब होता तरी अगदी सुखाने दोघेही आपला संसार चालवत होते. एक दिवस त्याच्या बायको ने आपल्यासाठी नवऱ्याकडे एका कंग व्या मागणी केली ... कंगवाच्या सहाय्याने तिला आपल्या लांब केसांची काळजी घ्यायची होती. आणि केसांची देखरेख करायची होती. पण ... तिच्या या मागणीने नवरा खुप दुःखी झाला आणि दुखी अंतकरणाने म्हणाला की , अग या महिन्यात तर माझा हात खुप च तंगीत आहे. माझ्याकडे एवढे ही पैसे नाहित की मी माझ्या घड्याळाचा तुटलेला पट्टा दुरूस्त करू शकेल... हे एकूण बायको शांतच राहिली आणि बायकोने आपल्या गोष्टीवर काही जास्त जोर दिला नाही. संध्याकाळी नवरा कामावरून घरी परत येत होता तेव्हा त्याची नजर एका घड्याळाच्या दुकानावर पडली. नवरा काही क्षण तिथेच थांबून विचार करू लागला. शेवटी त्याने ठरवले की आपण आपली घड्याळ या दुकान विकून टाकू आणि त्या पैसाने बायको साठी एक चांगला कंगवा विकत घेऊ आ...
Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi Best Birthday Wishes - मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Birthday Wishes For Daughter In Marathi नमस्कार मित्रांनो.... आपल्या जीवनातील महत्वाचा... आनंददायक...... कधीही न विसरणारा दिवस म्हणजे आपल्या लेकीचा.... मुलीचा... परीचा वाढदिवस. या दिवसाचा प्रत्येक आई - वडिलांच्या आयुष्यात एक विशेष महत्व असतो. आणि या दिवसाला आणखीनच विशेष बनविण्यासाठी निवडून छान छान मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा , happy birthday wishes for daughter in marathi, birthday wishes in marathi, happy birthday wishes, मराठी शुभेच्छा आणल्या आहेत. आशा करतो ह्या मराठी वाढदिवस शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आपल्या मुलीच्या वाढदिवसाला आणखीनच सुंदर बनवतील. प्रत्येक आई वडिलांच्या जीवनातील खरा दागिना .... खरा सोना म्हणजे मुलगी . कारण दोन्ही घराला प्रकाश देणारी ... आपल्या आई वडिलां चे नाव मोठे करणारी ...
35+ marathi status on life | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार नमस्कार मित्रांनो...... या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी जीवनावर / आयुष्यावर आधारित मराठी प्रेरणादायक सुविचार , सुंदर विचार , good thoughts in marathi on life , life quotes , sunder vichar, motivational quotes on life in marathi, जीवन जगात असतांना हे मराठी सुविचार तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील आणि जीवनात उपयोगी पडतील. हे सुविचार , छान विचार, चांगले विचार, जीवनातील कटू सत्य सांगणारे,,, आणि निराशेतून बाहेर काढणारे ठरतील आणि तुम्हाला नक्कीच आवडतील. जे लोक आपल्याला एक आनंदी व्यक्ती बनण्याची ऊर्जा देतात.... त्या लोकांचा सहवास नक्कीच वाढवावा. त्यांच्यावर प्रेम करावे... जीवनात सकारात्मक परिणाम होणार आहे.... याचा विचार करायला तेवढा आनंद नक्कीच पुरेसा होतो. आनंद निर्माण करण्यासाठी जर कारणेच पाहिजे असतील तर आत्ता या क्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते.... ? नाही... नक्कीच नाही.... म्हणूनच मी तु...
Thanks for giving so much useful post read these also
ReplyDeleteRaksha Bandhan Wishes In Marathi and
marriage biodata format in marathi