Posts

Showing posts from September, 2020

दृष्टीकोन - Marathi Suvichar - Sunder Vichar - Good Thoughts

Image
 दृष्टीकोन - Marathi Suvichar - Sunder Vichar - Good Thoughts एक नवीन लग्न झालेले जोडपे भाड्याने घर घेऊन राहायला येतात. एक दिवस दोघेही सोबत चहा घेत असतांना अचानक बायकोचे लक्ष समोरच्या घरी दोरीवर वाळत असलेल्या कपड्यांवर जाते आणि ते बघून आपल्या नवऱ्याला म्हणते… समोरच्या घरच्या लोकांना स्वच्छ कपडे धुता येत नाहीत… नवरा म्हणतो… त्यांच्या घरचा साबण संपला असेल.   परंतु काही दिवसांनी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको पुन्हा नवऱ्याला तीच तक्रार करते कि.. समोरील घरचे लोकं तर खूप चांगले आहेत... पण त्यांना स्वच्छ कपडे धुता येत नाही…! नवरा फक्त ऐकून घेतो… आणि आता हे नेहमीचे असते… चार – आठ दिवसात कपडे वाळत दिसले कि बायको आपल्या नवऱ्याला सांगत असते…   असाच एक दिवस पाहते तर, काय चमत्कार...! कपडे एकदम स्वच्छ धुतलेले...! हे बघून बायको नवर्‍याला म्हणते... अहो ऐकताय का... ? समोरच्या वहिनी सुधारल्या. त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले आहे असे वाटते... आज बघा कपडे अगदी चकाचक स्वच्छ धुवून वाळत घातले आहेत... तेवढयातच नवरा बोलतो.... माझ्या राणी... आज मी सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या सा

वडिलांचा आशीर्वाद - एक सुंदर बोधकथा – Marathi Story

Image
  वडिलांचा-आशीर्वाद-सुविचार-status-सुंदर-विचार वडिलांचा आशीर्वाद - एक सुंदर बोधकथा – Marathi Story गुजरात मधील खंभायत येथील एका व्यावसायिकाची ही सत्य घटना आहे.   असे माझ्या  वाचनात आलेले आहे. जेव्हा त्या व्यावसायिका ला वाटले कि आता आपला  शेवट निश्चित  आहे. तेव्हा त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाला जवळ करून म्हणाला की ... माझ्या लाडक्या मुला... तुला द्यायला माझ्याकडे   संपत्ती   नाही ...! पण मी जीवनभर सत्य  आणि सत्यतेनेच काम केले आहे . माझा आशीर्वाद आहे की ... तु आपल्या जीवनात खूप खूप  सुखी राहशील ...  तु जरी धूळ - मातीलाही स्पर्श केला तरी त्याचे देखील नक्कीच सोने होईल. मुलाने डोके टेकून वडिलांच्या पायाला स्पर्श केला. मुलाच्या  डोक्यावर हात  ठेवून   वडिलांनी  आशीर्वाद दिला आणि अगदी संतोष पूर्वक आपले प्राण सोडले. आता घराची सगळी जवाबदारी मुलगा धर्मपाल याच्यावर आली. त्याने छोट्या गाडीव रून   आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचा व्यवसाय हळू हळू वाढू लागला.    एक छोटीसी दुकान घेतली. व्यवसायात आणखी वाढ झाली.   आता   शहरातील संपन्न  लोकांमध्ये धर्मपाल ची गणना होऊ लागल