बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife 

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko- patni - wife - wedding -wishes - in - marathi
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko

बायकोला मराठीत अर्धांगिनी म्हणतात...! 
म्हणजे बायको ही आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे... 
पण इंग्रजीत बायकोची ओळख करून देतांना  " My Better Half " असे म्हणतात. 
म्हणजे आपल्यापेक्षा बायको ही काकणभर सरसच आहे असे त्यातून सुचवतात.

आयुष्यातल्या चढउतारात, सुखदुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभे राहून मला साथ देणारी 
माझ्यापेक्षा सरसचं...!

पत्नी,आई,सुन,बहिण,मावशी काकी अशा कित्येक नात्यात वावरताना ती नेहमीच माझ्यापेक्षाही 
उत्कृष्टच ठरली आहे. 
अशीच कायम आनंदी रहा. माझ्या आयुष्यात आनंद पसरवत रहा.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको....

उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस... 
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो. खरेतर बायकोही एक मैत्रीण असते... प्रेयसी असते... 
ती संसाररुपी रथाचा एक चाक असते. 
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात... 
अशीच माझी बायको समजूतदार.... नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी...घरसंसारात रमणारी.... 
जिवापाड प्रेम करणारी जिवलग बायको... मैत्रीण आणि बरीच काही...!

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपल्या वैवाहिक जीवनाला 14  वर्ष पूर्ण झाली आहेत.... 
मागे वळून पाहतांना या वर्षात तुझ जराही प्रेम कमी झाले नाही. 
आयुष्यातल्या प्रत्येक सुख दुःखात संघर्षात माझ्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहणारी 
बायको मिळाल्याबद्दल नक्कीच आजच्या प्रसंगी तुझे मनापासून आभार मानले पाहिजेत.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नेहमी अशीच हसत रहा ..आनंदी रहा यातच माझं सौख्य सामावलेले आहे. 
तु आहेस म्हणून मी आहे बस्...!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,
दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

पुन्हा एकदा तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आज आपल्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाली... नाती चारामिचा मंत्र जपत... 
मी तुझा हात हातात घेतला...!
आई-वडिलांच्या उंबेरठ्याची चौकट ओलांडून तू माझ्या जीवनात आलीश आणि वर्तुळ पूर्ण झाले.
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभले.
नेहमी सकारात्मक... नकारात्मकता च्या निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी....
तुझ्या येण्याने मला लौकीकाचे भान दिले...
यु मला काय दिलेस...! याचा हिशोब करणे सोडून दिले आहे मी...!
तसेही तारे मोजणे मला कधीही जमलेच नाही...!
मान्य आहे मला पूर्णपणे... अगदी तु ही स्वयंभू नाही आहेस ते...
पण तुझ्या असण्याने मला असण्याचा अस्तीत्व दिला आहे...!
खरे सांगू अगदी मना पासून... लोक भलेही तुला माझी अर्धांगीनी म्हणोत...
पण माझ्यासाठी मात्र तू माझे पूर्णत्व आहेस...!

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife 
 
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू मला साथ दिलीस 
कोणत्याही क्षणी तू माझ्या हातातला हात सोडला नाहीच.
कधी चिडलो... कधी भांडलो... कधी झाले भरपूर वाद... 
पण दुसर्‍याच क्षणी कानी आली
तुझी प्रेमळ साथ...

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife 

झोळी माझी खाली असतांना
लग्न माझ्याशी केलीस तू...
जरी वाटेवर होते धुके दाट
तरीही संसार सुखाच्या केलीस तू.

मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री
चांगली निभावलीस तू...
संकोच न करता माझ्या कुटुंबाला
चांगलेच सांभाळीस तू...

अशीच राहा हसत खेळत 
हेच एक सांगणे आहे....
अशीच प्रगती होऊ दे तुझी 
हेच देवाकडे मांगने आहे.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife 
 
या अनमोल जीवनाला सोबत तुझी हवी आहे... 
सोबतीला शेवट पर्यंत हात तुझा हवा आहे...
आली गेली कित्येक संकटे तरीही...
न डगमगनारा तुझा फक्त विश्वास हवा आहे.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - vijay bhagat - vb - wife
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife 

हे बंध रेशमाचे 
एका नात्यात गुंफलेले 
लग्न.... संसार.... आणि जवाबदारीने फुललेले
आनंदात नांदो संसार तुमचा

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife - lagna wadhdivas - bayko - vb - vijay bhagat - patni- wife
बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marriage Anniversary Wishes in Marathi to Wife 

तू आहे म्हणून तर... 
सगळे काही माझे आज आहे...
हे जरी नसले तरी तूच माझ्या प्रेमाचा ताज आहे.

माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस - जन्मदिवसाच्या शुभेच्छाचा आभार प्रकट

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नवरा बायकोचे प्रेम - नवरा बायको मराठी स्टेट्स | Husband wife Quotes In Marathi

Best Birthday Wishes || मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes For Daughter In Marathi

35+ Marathi Status On Life | जीवनावर आधारित मराठी प्रेरणादायक सुंदर विचार