वैवाहिक दैनंदिन जीवनातील नवरा बायकोचा गमतीदार संवाद

वैवाहिक दैनंदिन जीवनातील नवरा बायकोचा गमतीदार संवाद सकाळी सकाळी एका नवऱ्याने आपल्या बायकोला उठवले आणि म्हणाला ... नवरा :- अंग चल उठ... आज आपण दोघेही योगा क्लास ला जावूया... बायको :- कशाला... आणि मला सांगा... तुम्हांला मी एवढी लट्ठ दिसते की काय... ? नवरा :- अंग तसे काही नाही... योगा हे निरोगी राहण्यासाठी... आणि आपल्या शरीराला फिट ठेवण्यासाठी चांगले असते... बायको :- म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे आहे की ... मी अनफिट आहे... आजारी आहे... नवरा :- जावू दे गं... जर तुला नाही उठायचे तर...! बायको :- याचा काय अर्थ.... ? मला तुम्ही आळशी समजता की काय... ? नवरा :- नाही नाही... तुझा गैरसमज होत आहे... बायको :- आपले लग्न होऊन इतकी वर्षे झालीत आणि आज तुम्ही असे म्हणत आहात की... मी तुम्हाला समजु शकलो नाही... गैरसमज हो त आहे माझा... म्हणजे मला अक्कलच नाही आहे... देवा...! काय हे... नवरा :- अगं मी काही तसे म्हणालो काय... ? बायको :- म्हणजे.... मी खोटे बोलत आहे तर... नवरा :- बरे बरे... जाऊ दे गं आता... सकाळी सकाळी भांडण कशाला पाहिजे... बायको :- म्हणजे मी भांडण करते... मी भांडखोर आहे... ? नवरा :- ठ...